X

मुंबई टी २० लीग २०१९: सामना अहवाल दिवस दुसरा: सामना 1:चुरशीच्या लढतीत नॉर्थ मुंबई पँथर्सचा विजय 

नॉर्थ मुंबई पँथर्स संघाने टी-20 मुंबई लीग स्पर्धेच्या दुस-या सत्रातील  à¤¸à¤¾à¤®à¤¨à¥à¤¯à¤¾à¤¤ पहिल्यांदाच सहभागी झालेल्या ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघावर बुधवारी वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात सहा धावांनी विजय मिळवला. स्पर्धेतील हा तिसरा सामना सर्वाधिक धावांचा ठरला. सामना हा शेवटच्या षटकापर्यंत गेल्याने चुरस निर्माण झाली होती. पँथर्सचे कर्णधारपद पृथ्वी शॉ कडे होते. त्यामुळे  à¤¶à¥‡à¤µà¤Ÿà¤šà¥à¤¯à¤¾ चेंडूपर्यंत पोहोचलेला या सामन्यात तोही दबावाखाली वाटला. 

सामन्यात 191 धावसंख्येचा पाठलाग करणा-या ठाणे स्ट्रायकर्स संघाने शेवटपर्यंत आपले प्रयत्न सोडले नाही. त्यांच्या कौशिक चिखलीकर (41 चेंडूत 56 धावा, पाच चौकार व दोन षटकार) आणि कर्णधार आदित्य तरे ( 44 चेंडूत 71 धावा, दहा चौकार) यांनी चांगला खेळ केला.दोघांनीही दुस-या विकेटसाठी 87 धावांची भागिदारी रचली.

चिखलीकर माघारी परतल्यानंतर मैदानात आलेल्या सरफराझला जास्त काही करता आले नाही. तरे याने यानंतर संघासाठी धावा करणे सुरुच ठेवले व संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. शेवटच्या दोन षटकात संघाला विजयासाठी 26 धावांची गरज होती. तरे यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला व पुढच्याच चेंडूवर सागर मिश्रा देखील माघारी परतला. शेवटच्या षटकात स्ट्रायकर्सला विजयासाठी 16 धावांची गरज होती. मूनदीप मांगेलाने काही फटके मारले पण, संघाला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले.

पँथर्स संघाकडून साईराज पाटील (18 चेंडूत 46 धावा तीन चौकार व चार षटकार) व करण नांदे (23 चेंडूत 50 धावा, नऊ चौकार) यांनी चांगला खेळ केला. कर्णधार पृथ्वी शॉ ने संघाला चांगली सुरुवात दिली पण, चौथ्या षटकात तो धावचीत झाला. पण, युवा पाटीलने चांगला खेळ करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. पाटील बाद झाल्यानंतर नांदेने आक्रमक खेळ करत संघाला 8 बाद 190 धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दुस-या हंगामातील आतापर्यंतची ही सर्वाधिक धावसंख्या आहे.

दुस-या सामन्यात आर्क्स अंधेरी संघाने नाणेफेक जिंकत श्रेयस अय्यरच्या नमो वांद्रे ब्लास्टर्स विरुद्ध क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
....................................
 à¤¸à¤‚क्षिप्त धावफलक : 
- नॉर्थ मुंबई पँथर्स : 20 षटकात 8 बाद 190 धावा ( करण नांदे 50, साईराज पाटील 46, सरफराझ खान (1/11), अंकुश जैसवाल (1/23) वि.वि. ईगल ठाणे स्ट्रायकर्स : 20 षटकात 5 बाद 184 धावा ( आदित्य तरे 71, कौशिक चिखलीकर 56, आतिफ अत्तरवाला 3/37, प्रथमेश डाके 2/41)
- सामनावीर : करण नांदे ( नॉर्थ मुंबई पँथर्स)
- निकाल : नॉर्थ मुंबई पँथर्सचा सहा धावांनी विजय 
....................................
- गुरुवारचे सामने :
3.30 : ट्रायम्प नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट वि. सोबो सुपरसॉनिक्स 
7.30 : ईगल ठाणे स्ट्रायकर्स वि. आकाश टायगर्स एमडब्ल्युएस


Related Post