X

मुंबई टी २० लीग २०१९: सामना अहवाल दिवस 3: सामना 1: टंकच्या खेळीमुळे सुपरसॉनिक्स संघाचा ट्रायम्प नाई

मुंबई, 16 मे: सोबो सुपरसॉनिक्स संघाने गतविजेत्या ट्रायम्प नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट संघाला पराभूत करत वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या टी-20 मुंबई लीगमध्ये मंगळवारी सलग दुस-या विजयाची नोंद केली.

सुपरसॉनिक्स संघाचा कर्णधार जय बिस्ताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या गोलंदाजांनी देखील त्याला चांगली साथ दिली व नाईट्स संघाला 8 बाद 143 धावसंख्येवर रोखले. यानंतर सुपरसॉनिक्स संघाकडून हर्ष टंकने 47 धावांची ( 39 चेंडू, पाच चौकार, एक षटकार) खेळी करत विजयात योगदान दिले. सुपरसॉनिक्सच्या मधल्या फळीतील फलंदाज झटपट माघारी परतले असले तरीही त्यांनी चार विकेट्स शिल्लक ठेवत विजय मिळवला.

सुपरसॉनिक्स संघाच्या 13 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर टंक बाद झाला. यानंतर नाईट्स संघाच्या गोलंदाजांनी 25 धावात त्यांचे तीन गडी माघारी धाडले व संघाची अवस्था 5 बाद 118 अशी केली. दरम्यान रोहन राजेचा झेल प्रसाद पाटीलने सोडत त्याला जीवदान दिले. यानंतर राजेने 7 चेंडूत 14 धावा केल्या व त्यामुळे सुपरसॉनिक्स संघाला पुर्ण गुण मिळवता आले.

त्यापुर्वी, सुपरसॉनिक्सच्या गोलंदाजांनी नाईट्सच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत पाडले. करण मोरेने 55 धावांची (35 चेंडू, आठ चौकार) खेळी केली. इतर फलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांनी चांगले आव्हान दिले.राजे, बद्रे आलम व ध्रुमिल मटकर या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील गोलंदाजांनी सुर्यकुमार यादवला देखील फारशी संधी दिली नाही. त्यामुळे मोरेला दुस-या बाजूने साथ मिळाली नाही. त्यामुळे गतविजेत्या या संघाला सलग दुस-या पराभवाला सामोरे जावे लागले. दुस-या सामन्यात ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकत आकाश टायगर्स एमडब्ल्युएस विरुद्ध क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

.................
- सक्षिप्त धावफलक : 
- ट्रायम्प नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट : 20 षटकात 8 बाद 143 धावा ( करण मोरे 55, सुर्यकुमार यादव 20, दिपक शेट्टी 3/18, वैभव माळी 2/28) पराभूत वि. सोबो सुपरसॉनिक्स : 19.5 षटकात 6 बाद 144 धावा ( हर्ष टंक 47, जय बिस्ता 24, रॉयस्टन डायस 3/26, प्रसाद पाटील 2/24)

- निकाल : सोबो सुपरसॉनिक्स संघाचा चार विकेट्स व एक चेंडू शिल्लक ठेऊन विजय 

- सामनावीर : दिपक शेट्टी 
...........................
- वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारचे सामने :
3.30 : शिवाजी पार्क लायन्स वि. आर्क्स अंधेरी 


Related Post